लंडन मध्ये शिवजयंती साजरी:औरंगाबादच्या राजीव राजवर्धन राऊतचा सहभाग

लंडन :-देशाबरोबर विदेशात देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला,लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनच्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यात औरंगाबादच्या राजवर्धन राऊत याने ही पुढाकार घेतला.

लंडन मधील ‘डबल ट्रि बाय हिल्टन’      हॉटेल मधील सभागृहात भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, तसेच लंडन मधील रस्त्यावर मार्बल आर्च परिसरात विद्यार्थ्यांनी शिवजयंती ची रॅली देखील काढली.

दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी मराठी मुलांच्या मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युथ असोशियशन ची देखील स्थापना करण्यात आली. याच्या अध्यक्षपदी धीरजसिंग तौर यांची निवड करण्यात आली.