नांदेड जिल्ह्यात 362 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 4 :- शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 362 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 268 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 381 अहवालापैकी 966 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 8 हजार 212 एवढी झाली असून यातील 5 हजार 203 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.85 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 271 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात आज 6 जणांचा मृत्यू झाला असून मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 46 वर्षाचा देगलूर येथील एक पुरुष, 61 वर्षाचा विनायकनगर नांदेड येथील एक पुरुष, 70 वर्षाचा विष्णुपुरी नांदेड येथील एक पुरुष, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष, 50 वर्षाचा किनवट येथील पुरुष तर खाजगी रुग्णालयात गणराज प्लाझा नांदेड येथील 56 वर्षाचा एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 257 झाली आहे.

आज बरे झालेल्या 202 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 288 बाधित आढळले.जिल्ह्यात 2 हजार 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण सर्वेक्षण 1 लाख 52 हजार 613घेतलेले स्वॅब- 53 हजार 063,निगेटिव्ह स्वॅब- 42 हजार 658,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 362,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 212,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,एकूण मृत्यू संख्या- 257,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 203,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 698,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 488, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 271.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *