कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वटसावित्री पौर्णिमा सण घरातून साजरा करावा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

बीड, दि. ४ :- वटसावित्री पौर्णिमा सण उद्या शुक्रवार दिनांक ५ जून रोजी साजरा होणार आहे यंदा महिलांनी हा सण साजरा करताना घरातच कुंडीत वडाच्या रोपाची पूजा करावी किंवा बाजारात वडाच्या पूजेसाठीचा फोटो मिळतो तो वापरून पूजा करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सण साजरा करताना एकत्र येणे योग्य नाही असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे

Image may contain: 1 person, sitting and indoor

जिल्ह्यातील विविध गावात किंवा शहरांत वडाच्या पुजेच्या निमित्ताने महिला एकत्र येतील व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स ) राहणार नाही तसेच वसाहती ,काॅलनी व गाव तांडावर एखाद्या वडाच्या झाडाभोवती जास्त गर्दी होऊ नये. तसेच मुंबई व बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व क्वॅारंटाईन असलेल्या महिलांनी पूजेसाठी बाहेर पडू नये.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी परिसरातील व गावातल्या इतर महिलांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन यानिमित्ताने जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *