छत्रपती शाहू  महाविद्यालयाच्या स्वयंचलित पालेभाजी लागवड यंत्राला प्रथम पारितोषिक

भोपाळ येथील इंडियन इंटरनॅशनल सायन्स आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव

औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित (सी. एस.एम.एस.एस.) छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीफण टीम समस्काराच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित रोप लागवडणी यंत्र बनवलेले आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि अंतराळ मंत्रालयाने आयोजित केलेल्या एन.आय.टी., भोपाळ येथे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (आय. आय. एस. एफ.) आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात स्वयंचलित पालेभाजी लागवड यंत्राला प्रथम पारितोषिक प्राप्त केले. 

इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ) हा भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या यशाचा उत्सव आहे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी लोकसहभागाचा उत्सव आहे. 2018 पासून लखनौ येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालक , अंतराळ मंत्रालयाने याचे आयोजन केले होते. 2019 मध्ये कोलकाता 2021 गोवा आणि 2022 मध्ये मध्य प्रदेश येथे आयोजन केले होते.

टोमॅटो, मिरची आणि वांगी यांसारख्या वनस्पतींची लागवड स्वयंचलित भाजीपाला लागवड यंत्राद्वारे करता येते. ही यंत्रणा कमीत कमी मनुष्यबळ आणि कमी वेळेत अधिक भाजीपाल्याची रोपे लावू शकते. यंत्रामुळे दोन रोपांमधील अंतरही कमी होते, त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन मिळते. ट्रेमधुन रोप उचलुन हे आपोआप जमिनीत लावले जाते.

      यंत्र विकसित करण्यासाठी महाविद्यालयाच्या टीममध्ये आणि वैभव जाधव (कॅप्टन), सोपान भोपळे (ऍडमिनिस्ट्रेशन), अभिषेक अधाने (लॅब मॅनॅजमेण्ट), रविंद्र घाटे आणि महेश हेंद्रे (फीडिंग सिस्टिम), शेख दानियाल, गुफरान अन्सारी (पिक-अप,हॉपर मेकॅनिझम), गणेश जंढे, राणी राठोड, (पॉवर ट्रान्समिशन) अनिकेत विसपुते, रोहन मुरदारे, ओम घाडगे, अनिकेत गाडे, पवन कर्पे, श्रीनाथ पाटील, नितीन ताठे, हरिओम काबरा, अनिकेत साळुंके, अर्जुन मटने, बिनीत सिंग, ओंकार हुगेवार (मॅनुफॅकच्युरींग), जान्हवी पाटील, मयुरी जामदार, रिया धूत, जान्हवी बैरागी, आरती मोहन (मार्केटिंग), निकिता राठोड, प्रदीप डोंगरे, महेश लघाणे, अल्ताफ शेख (ऍक्चुएटर अँड लॉजिक प्रोग्रामिंग सिस्टिम), फॅकल्टी ऍडवाईझर प्रा. सचिन लहाने, प्रा युवराज नरवडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. आर. पी. चोपडे, अंकिता ऍग्रो इंजिनीरिंग चे डायरेक्टर श्री एस. एन. पाटील, श्री विष्णू खडप, श्री सुनिल जाधव व शेती अभ्यासक श्री.जनार्धन कांबळे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.  रणजित मुळे, सचिव श्री.  पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

स्वयंचलित रोप लागवडणी यंत्राच्या प्रकल्पाचे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे सादरीकरण  

छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यामधील टीफण टीम समस्काराच्या विद्यार्थयांनी स्वयंचलित रोप लागवडणी यंत्र बनवलेले आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये १० जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान ‘अविष्कार’ या उपक्रमांतर्गत ८० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यामधून छत्रपती शाहू कॉलेजमधील पालेभाजी लागवड यंत्राची राजभवन, मुंबई येथे प्रकल्पाच्या सादरी कारणासाठी निवड झाली होती. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे राज्यपाल श्री.  भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.