विभागीय माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

औरंगाबाद, दि. 26-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त  माहिती अधिकारी मीरा ढास यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

 विभागीय माहिती कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमाला सहाय्यक संचालक (माहिती) गणेश फुंदे, लेखापाल प्रविण भानेगावकर आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.