आत्तापर्यंत एकूण 86,983 कोरोना बाधितरुग्ण बरे

दिल्ली-मुंबई, 31 मे 2020
गेल्या 24 तासात 4,614 रुग्ण बरे झाल्याचे आढळून आले. आत्तापर्यंत एकूण 86,983 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 47.76% वर पोहोचले आहे. आजमितीस सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली 89,995 रुग्ण आहेत.
इतरअपडेट्स:
- मोदी 2.0 सरकारने गेल्या एक वर्षात घेतलेल्या विविध निर्णयांचा एक व्यापक सारांश, भारतीय इतिहासातील निर्णायक काळ आणि नवीन भारत, एका उज्ज्वल भारताची पहाट याबाबत एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली
- टाळेबंदीच्या काळात टेलिफोन व इंटरनेट सेवा ही नागरिकांना बाहेरील जगाशी जोडून ठेवणारी नाळ बनली आहे. टाळेबंदीच्या काळात व्यावसायिक असो वा करमणूक या दोन्ही गरजांसाठी ऑनलाईन सेवांची मागणी गगनाला भिडली. राज्यातील भारत संचार निगम मर्यादित अर्थात ‘बीएसएनएल’ने या सेवेचा कणा म्हणून पुन्हा एकदा आपली भूमिका पार पाडली.
- कोविड-19 विरुद्धच्या लढाईत अजून एक महत्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय सार्वजनिक उद्यम आणि देशाची अग्रणी एनबीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) उत्तराखंड सरकारला 1.23 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी पुढे सरसावली आहे.
- आपल्या मुलभूत कर्तव्यांप्रती युवकांना जागरूक करण्यासाठी पंजाब मधल्या सेन्ट्रल युनिवर्सिटी ऑफ पंजाब भटिंडाने (सीयुपीबी) ’ए रिमांयडर ऑन फंडामेंटल ड्युटी’ हा लघु व्हिडीओ जारी केला आहे. सीयुपीबी ईबीएसबी क्लबने हा व्हिडीओ ’एक भारत श्रेष्ठ भारत’अंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आणि कुलगुरू प्रा.आर के कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे.
- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मागील एका वर्षातील ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या कामगिरी आणि उपक्रमांची माहिती दिली. लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्याची वाहतूक आणि लोकांना मोफत वितरण सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वात मोठी कामगिरी आहे.
- सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान, विधी व न्याय आणि दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारताच्या www.ai.gov.inया कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक राष्ट्रीय संकेतस्थळाचा प्रारंभ केला.
- मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 30 मे, 2019 ते 30 मे 2020 या कालावधीतील डीएआरपीजी अर्थात प्रशासकीय सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या कामगिरीवरील ई-पुस्तिकेचे प्रकाशन केले. लोकांसमोर आपली कामगिरी सादर करणारा पहिला विभाग असल्याबद्दल डॉ. सिंह यांनी विभागाचे कौतुक केले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
- रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारांना श्रमिक गाड्यांच्या योग्य नियोजन व समन्वय राखण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचविण्याची अंदाजित मागणी योग्य प्रकारे निर्धारित आणि निश्चित करण्याची विनंती केली आहे.
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परिसर टप्प्याटप्प्याने पुन्हा खुला करण्यासाठी गृह मंत्रालयाने (एमएचए) नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.