पंतप्रधानांनी केला उल्लेख,रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची केली  उकल

नवी दिल्ली ,३०ऑगस्ट :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील  ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने  सन्मानित  श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले,  आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.

स्थानिक प्रजातीच्या श्वानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या पालनासाठी येणारा खर्च कमी आहे आणि ते भारतीय वातावरणात सामावले जातात. सुरक्षा संस्था स्थानिक प्रजातीच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकात समाविष्ट करत आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेने स्थानिक प्रजातीचे श्वान अधिक चांगले आणि लाभदायक ठरण्यासाठी त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी श्रोत्यांना एक तरी स्थानिक प्रजातीच्या श्वानाचे पालन करावे, यासाठी प्रेरित केले.     

बीड पोलीस दलातील रॉकी श्वानाचे दि.15 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.हा आजार रॉकीला कर्तव्यावर असतांना गुन्ह्याच्या घटनास्थळावर आरोपीचा शोध घेतांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे जखम होऊन झाला होता.राष्ट्रीय AIPDM कास्य पदक विजेता,356 गुन्ह्याचा छडा लावणारा, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा प्रामाणिक योद्धा रॉकीच्या जाण्याने गमावला आहे.रॉकीने केलेली कामगिरी बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील.या शहीद श्वान सेनानीला शोकाकूल बीड पोलीस परिवाराकडून शोक सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Image

बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!  दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत.

रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील.

– गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *