सीमेवर युद्धजन्य परिस्थिती, चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

नवी दिल्‍ली,
लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर चीनी सैनिकांशी झालेल्‍या हिंसक झटापटीनंतर उद्भवलेल्‍या परिस्‍थितीवर भारतीय सेनेने जशाच तसे उत्‍तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. लडाखच्या सीमेवर भारतीय सेनेने चौकी, पहारे आणि गस्‍त वाढवली आहे. तसेच चीनी सैनिकांच्या प्रत्‍येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. दरम्‍यान, सेनेने मोठे पाऊल उचलले असून, जवान आणि अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द केल्‍या आहेत. जे लष्‍करी अधिकारी आणि जवान सुट्टीवर गेले होते. तसेच ज्‍या जवानांना लॉकडाऊन काळात कोरोनामुळे न येण्यास सांगण्यात आले होते, त्‍या सर्व जवानांच्या सुट्टया रद्‍द करून ड्‍युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारतीय सेना पुर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. तसेच लेह आणि आसपासच्या सीमेवर सेनेकडून गस्‍त वाढवण्यात आली आहे. या सोबतच लडाखमध्ये तैनात सेनेच्या ज्‍या युनिट पीस स्‍टेशनकडे परतणार होत्‍या, त्‍या सर्व युनिटना आहे तेथेच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काश्मीरच्या विविध भागात तैनात असलेल्‍या सेनेच्या तुकड्यांनाही गस्‍तीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
 
भारत-चीन सीमेवरील परिस्‍थिती आणखी बिघडण्याच्या शक्‍यतेने लष्‍कराकडून अनेक महत्‍वपूर्ण पावले अचलण्यास सुरूवात केली आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून सीमेलगत असलेल्‍या गावांना खाली करण्यास सुरुवात केली आहे. तसेच देमचोक आणि पेगाँन्ग लेक जवळ राहणाऱ्या लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
 
सेनेकडून सीमेला लागून असलेल्‍या भागात अजून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या परिसरात मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यावेळी इतकी सतर्कता ठेवली जात आहे की, सेनेचे लँडलाईन फोनही बंद करण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी फक्‍त ऑपरेशनशी जोडलेले फोनच काम करत आहेत. या फोनवरील इनकमिंगची सुविधा देखील बंद करण्यात आले आहेत.

‘म्हणून जवानांनी हत्यारं चालवली नाहीत’, परराष्ट्र मंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

चीनच्या सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले होते. गलवानमध्ये सैनिकांना हत्यारं नसताना का पाठवण्यात आलं? असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. राहुल गांधी यांच्या या ट्विटला परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

‘पहिले आपल्याला तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. सीमेवर असलेल्या सैनिकांकडे नेहमीच हत्यारं असतात, खासकरून जेव्हा ते आपली जागा सोडतात. १५ जूनला गलवानमध्ये असलेल्या जवानांनी पण असंच केलं. पण १९९६ आणि २००५ सालच्या करारानुसार एलएसीवर झटापटीच्या दरम्यान हत्यारांचा वापर केला जात नाही,’ असं जयशंकर म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला होता. ‘बंधू आणि भगिनींनो चीनने भारताच्या शस्त्रहीन सैनिकांची हत्या करून मोठा अपराध केला आहे. भारताच्या वीर जवानांना हत्याराशिवाय धोक्याकडे कोणी आणि का पाठवलं? असा माझा प्रश्न आहे. याला जबाबदार कोण आहे?’ असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *