माझ्या टी-शर्टवर इतका आक्षेप का घेतला जात आहे – राहुल गांधी

मोदीजी पत्रकार परिषद घेत नाहीत, मी तुम्हाला त्यांचे काही मुद्दे देखील सांगू शकतो

नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :- राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 110 हून अधिक दिवस उलटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या टी-शर्टवर सातत्याने टीका होत आहे. राहुल गांधी स्वेटर नाही तर टी-शर्ट घालतात. राहुल गांधींच्या टी-शर्टची किंमत ठराविक आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. 

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

मला समजत नाही की माझ्या टी-शर्टवर इतका आक्षेप का घेतला जात आहे? त्याची इतकी चर्चा का होत आहे? या टी-शर्टबद्दल इतके आक्षेपार्ह काय आहे? इथे कोणी टी-शर्ट घातलेला नाही का? मी स्वेटर घालावे असे तुम्हाला काय वाटते? त्यापेक्षा मी एक काम करतो. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर मी व्हिडिओ बनवतो. त्यात, मी तुम्हाला टी-शर्ट कसा घालायचा ते सांगेन. पत्रकार म्हणाला टी-शर्टचे रहस्य काय आहे? यावर राहुल गांधी हसले आणि म्हणाले की, तुम्हाला थंडी वाजण्याची भीती वाटते म्हणून तुम्ही स्वेटर घालता. मला थंडीची भीती वाटत नाही. आज मला वाटते की मोदीजी पत्रकार परिषद घेत नाहीत, मी तुम्हाला त्यांचे काही मुद्दे देखील सांगू शकतो. मला सध्या थंडी नाही. पण जर मला थंडी वाजायला लागली तर मी नक्कीच स्वेटर घालेन.