पालखेड सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वैजापूर,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापुर तालुक्यातील पालखेड गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच सर्व संचालक व ग्रामस्थांनी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिल्याने आ.बोरणारे यांच्यावतीने  माजी नगराध्यक्ष साबेरखान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, संजय पाटील बोरनारे, रणजीत  चव्हाण, उपविभागप्रमुख प्रभाकर जाधव व अमीर अली यांनी पालखेड या सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी पारसनाथ पाटील भाडाईत व व्हाईस चेअरमनपदी रामभाऊ घोडके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. 

यावेळी संचालक अशोक पाटील शेळके, गोरख त्रिभुवन, निवृत्ती मुलमुले, प्रदीप पाटील शेळके, पुंडलीक  मोकाटे, दिलीप शेळके, नारायण धनाड,  अलकाबाई कांहे, राहुल शेळके, कडू कान्हे, प्रकाश सुरासे, अशोक धनाड, भागिनाथ घोडके, माणिक  मोकाटे, जयराम धनाड, गणेश भाडाईत, संदीप सूरासे, सुभाष घोडके, ज्ञानेश्वर भाडाईत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.