वैजापूर येथे पर्यावरणदिनानिमित्त जेष्ठ नागरिकांनी घेतली वृक्षारोपण संवर्धनाची शपथ

वैजापूर ,५ जून  /प्रतिनिधी :-जागतिक पर्यावरण दिनानिमित येथील वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघ,आधार जेष्ठ नागरिक संघ व महिला संघ  सदस्यांनी झाडे लावू त्यांचे संरक्षण, संवर्धन व संगोपन करण्याची शपथ घेतली तसेच पर्यावरण स्वच्छता प्रत्यक्ष करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.

सामाजिक कार्यकर्ते तथा पालिकेचे स्वछतादूत ठाकूर धोंडिरामसिंह अध्यक्षस्थानी होते.प्लास्टिकला नाही म्हणा हा संकल्पही यावेळी करण्यात आला. घरातील ओला, सुका व हानिकारक कचरा वेगळा करून तो दररोज घंटा गाडीत टाकावा असे धोंडीराम राजपूत यांनी शहरवासीयांना आवाहन केले. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत व सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन ही या उपक्रमात लाभले. 

या उपक्रमात जेष्ट नागरिक उत्तमराव साळुंके, श्री उगले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम, एस.टी. चालक विठ्ठल वाणी, जेष्ठ पत्रकारघनश्याम वाणी,जेष्ठ, बी.बी.डगळे, श्री पी,वाणी, बाळू वाणी, सोन्याबापू गावडे, जेष्ठ नागरिक बबन क्षीरसागर तसेच युवा वर्ग व महिला वर्ग  मोठया संख्येने सहभागी झाले होते.  स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सहायक रमेश त्रिभुवन, घंटा गाडी चालक विलास त्रिभुवन व त्यांचे सहाय्यक विशाल चौधरी यांनी सहकार्य केले.