कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक 

अजित पवारांनी का केली अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी?

गायरान जमीन प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

नागपूर : सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असून कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

दुसरीकडे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को, ५० खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके, वसुली सरकार हाय हाय, श्रीखंड घ्या, कुणी भूखंड घ्या, अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.

गायरान जमीन प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा -विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.

२८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले. 

उच्च न्यायालय नागपूर बेंच येथे २२ डिसेंबर २०२२ ला एक आदेश दिले. १७ जून २०२२ रोजी वाशीम येथील ३७ बिंदूं १९ एकर गायरान जमीन बेकायदेशीररित्या तत्कालीन राज्य महसूलमंत्री व आताचे कृषीमंत्री यांनी दिली. या संदर्भात १२ जुलै २०११ च्या राज्य शासनाच्या निर्णयाकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून ३७ एकर गायरान जमीन बेकायदेशीरपणे देण्याचा निर्णय सत्तार यांनी घेतला. 

 एकूण ५ प्रकरण ही न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे आदेश डावलून सत्तार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचे दाखले दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

*मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या निर्णय घेतलेली एकूण ५ प्रकरण खालीलप्रमाणे*

३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररित्या दिली.

  सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला.

 तसेच संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या  कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते.संभाजीनगर मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं कामकेलं.  जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

सत्तारांवरील आरोपांची फडणवीसांकडून गंभीर दखल

कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली