वैजापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हक्क जागृती

वैजापूर,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-या जगतातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ग्राहक आहे, अलीकडे  कोणताही माल घेताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये. त्यांनी घेतलेल्या मालाचे किंवा वस्तूचे रीतसर बिल घ्यावे. खराब निघालेला माल दुकान मालकाने परत घ्यावा. ग्राहकांना ग्राहक मंचकडे दाद मागण्याचा अधिकार आहे हे ग्राहकांना समजावे यासाठी शहरातील  के.पी.सुपर मार्केटमध्ये शनिवारी (ता.24) राष्ट्रीय ग्राहक दिननिमित्त ग्राहक मेळावा घेऊन ग्राहकांचे प्रबोधन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.

धोंडीरामसिंह राजपूत यांनी ग्राहकांच्या हक्क विषयक कायद्याची माहिती ग्राहकांना दिली. माल/वस्तू घेतल्यावर पावती घेण्याच्या सूचनाही केल्या. या फर्मचे मालक सुनंदीलाल बोथरा व अमृतलाल बोथरा  यांच्या उपस्थितीत हा ग्राहक मेळावा घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, जर ग्राहकाला माला/वस्तू पसंद पडली नाही तर ती वस्तू परत घेऊन बदलून दिली जाते किंवा पैसे परत केल्या जातात. ग्राहकांना पूर्ण सहकार्य दिल्या जाते असेही ते म्हणाले.  फर्मचे प्रमुख प्रकाशचंद बोथरा ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी विलास जाधव हे औरंगाबाद येथून आले होते. तेही ग्राहकांचे हक्क जागृती बाबत समाधानी झाले.