वैजापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४५१ प्रकरणात तडजोड ;११ कोटी ७० लाख रुपयांची वसुली

वैजापूर,३ मार्च / प्रतिनिधी :-वैजापूर जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतमध्ये रविवारी (ता.03) तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 7874 पैकी 451 प्रकरणात तडजोड होऊन 11 कोटी 70 लाख तीन हजार चारशे साठ रुपयांची रक्कम वसूल झाली. 

जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम. मोहियोद्दीन यांच्याहस्ते लोकअदालतचे उदघाटन झाले. या वेळी जिल्हा न्यायालयाचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. मुळे, दिवाणी सह न्यायाधीश आर. एम. करडे, प्रथम न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ, न्या.एस.के.खान, न्या. व्ही. आर. कुलकर्णी, वकील संघ ग्राहक सहकारी सोसायटीचे चेअरमन अँड. सोपान पवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. संदीप डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वकील संघाचे सचिव प्रदीप चंदणे, उपाध्यक्ष अँड. ज्योती शिंदे कापसे, कोषाध्यक्ष अँड. राहुल धनाड यांच्यासह अँड. बाबासाहेब अढांगळे, अँड तुषार थोट, अँड इम्रान शेख, अँड. दैवशाला निर्मले, अँड. ज्ञानेश्वर वर्पे, अँड. मुजाहिद शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.

लोकआदालत यशस्वी करण्यासाठी अँड. आसाराम रोठे, अँड. नानासाहेब जगताप, अँड. आर. डी. थोट, अँड, के. बी. कदम, अँड. एस. एस. ठोले, अँड.ए.सी. चव्हाण, अँड. मनोहर दिवाकर, अँड. देविदास बावचे, अँड. रामकृष्ण बोडखे, अँड. किरण त्रिभुवन, अँड. अनुराधा उबाळे, अँड. सय्यद नुजहत, अँड.सय्यद रईस, अँड. सुभाष खैरनार, अँड. प्रदीप बत्तासे, अँड संजय बत्तीसे, अँड. एन. आर. गायकवाड, अँड. राजू शिंदे, अँड. कृष्णा गडे, अँड. महेश कदम, अँड. मजहर बेग, अँड. संतोष जेजुरकर, अँड. नितीन बावचे, अँड. आणासहेब बागुल, अँड. आकाश ठोळे, अँड. सुभाष खैरनार अँड.नितीन बावचे, अँड. संदीप गायकवाड, अँड. रमेश थोरात  न्यायालयीन कर्मचारी धनंजय आंबेकर व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.