वैजापुरात आ.जयंत पाटील यांच्या निलंबन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

वैजापूर,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केल्याप्रकरणी वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (ता.24) निषेध करण्यात आला.

जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे आंदोलन केले व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रतापराव निंबाळकर, नगरसेवक उल्हास पाटील ठोंबरे, दत्तात्रय पाटील त्रिभुवन,  सुरज नाना पवार, बाळासाहेब भोसले, बाळू पाटील शेळके, आनंद निकम, गणेश चव्हाण, विजय पाटील पवार,  साईनाथ आहेर, विशाल पाटील शेळके, दिगंबर मोरे.   राजेंद्र पाटील कराळे, बाबासाहेब थोरात, विलास  पवार, भानूमामा जगदाळे, सत्यजित पाटील सोमंवशी, अमृत पाटील शिंदे, गणेश पाटील पवार, एराज शेख, राजेक  शेख, हिराबाई अशोक जाधव, मीराताई पाटील, संदीप मोटे, सोनू पोटे, दिपक जाधव, जुनेद शेख आदींचा सहभाग होता.