शिवसेनेत प्रवेश घेतल्याबद्दल माजी आमदार चिकटगावकर यांचा तलवाडा येथे सत्कार

वैजापूर,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी प्रवेश घेतल्याबद्दल वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.22) त्यांची गावातून मिरवणूक काढून सत्कार केला. 

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, सभापती मनाजी पाटील मिसाळ, पी.आर.जाधव, रिखबचंद पाटणी, उत्तम काका निकम, भाऊसाहेब पाटील गलांडे, मोहनराव साळुंके, सजनराव शिंदे, विठ्ठल पाटील डमाळे, साईनाथ मतसागर, प्रशांत शिंदे, गौतम पैलवान, भिकन सोमासे, दत्तुभाऊ कुंदे,भाऊसाहेब पाटील शिंदे, संतोष सूर्यवंशी, किशोर मगर, प्रशांत हुकिरे आदीसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते