श्रीक्षेत्र सराला बेट येथे सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या 120 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाची काल्याच्या किर्तनाने सांगता

वैजापूर,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-श्री क्षेत्र “गोदावरी धाम” बेट सराला येथे योगीराज सदगुरू श्री.गंगागिरीजी महाराज यांची 120 वी पुण्यतिथी व मंदीर जिर्णोध्दारपुर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची सांगता शुक्रवारी (ता.23) बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने झाली.

या सोहळ्यास आमदार रमेश पाटील बोरणारे, आ. स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, मा. नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, पंढरपूर मठाचे अध्यक्ष गोंदवले, कृष्णा पाटील डोणगांवकर,  आदींची उपस्थिती होती.

आ. रमेश पाटील बोरणारे व मा. नगराध्यक्ष साबेर खान यांनी कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात 151 पोते साखर कबूल केले असता आज आर्थिक स्वरूपात 5 लाख रुपये देणगी महाराजांकडे सपूर्द केली तसेच पुढील वर्षी वैजापूर येथे होणाऱ्या 2023 अखंड हरिनाम सप्ताहासाठी 11 लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. 

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, गोटूसिंग राजपूत, ज्ञानेश्वर टेके यांच्यासह बेटातील भक्त परिवार व वारकरी संप्रदाय मोठ्यासंख्येने उपस्थित होते.