भाजपाच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळून परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोच्या पुतळ्याचे दहन

औरंगाबाद,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये रस्त्यावर उतरली.येथे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले. त्या विरोधात देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या , दहशतवादी  पोसणाऱ्या पाकिस्तानचा ध्वज जाळून , भाजपने निषेध नोंदवला .पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री  यांच्या फोटोला लाथा बुक्क्यांनी कार्यकर्त्यांनी तुडवले व त्यांचा पुतळा जाळला.

पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना खतपाणी घालणारे राष्ट्र आहे.हे आंतरराष्ट्रीय मंचावर आता सिद्ध झाले आहे , असा आरोप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला.या वेळी कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो , नरेंद्र मोदी जैसा हो , नरेंद्र मोदी तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है , दहशतवादाचे साम्राज्य असणाऱ्या पाकिस्तानचा करायचं काय ,खाली मुंडकं वर पाय, या प्रकारच्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

 या वेळी प्रामुख्याने उपस्थित असलेले राज्याचे सहकार, ओबीसी कल्याण,  इतर मागासवर्गीय मंत्री आमदार अतुल सावे म्हणाले की,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन देशाचे सर्वोच्च पदावर पोहोचलेले नेते आहेत.भारताची लोकशाही ही अतिशय प्रबळ व बळकट आहे.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत.बिलावल भुट्टो यांना वेड्यासारखी बरळण्याची सवय लागलेली आहे.जगाला दहशतवादी पुरवण्याची फॅक्टरी म्हणजे पाकिस्तान आहे.जगभरामध्ये जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्या प्रत्येका मध्ये कुठे ने कुठे पाकिस्तानचा हात आहे .याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानमध्ये  दहशतवादी गटांचे राज्य आहे आणि जेव्हा वाटेल तेव्हा ते बरळत असतात असा आरोप कॅबिनेट मंत्री आमदार अतुल सावे यांनी केला.

या वेळी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे , प्रदेश सचिव प्रवीण घुगे , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर , ओबीसी मोर्च  प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे ,जालीदर शेंडगे , यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात आली , या वेळी राजेश मेहता , राजू शिंदे , कचरू घोडके , अनिल मकरिये , दिलीप थोरात , विजय आवताडे, डॉ.राम बुधवंत ,लता दलाल ,अमृता पालोदकर , डॉ. उज्वला दहिफळे ,दीपक ढाकणे , रामेश्वर भादवे , हाजी दौलत खान पठाण ,बबन नरवडे , हाफीज शेख, राजगैरव वानखेडे,गोविंद केंद्रे , सिद्धार्थ साळवे ,वर्ष साळुंके ,साधना सुरडकर , मनीषा मुंडे ,मनीषा भन्साली , दिव्या पाटील , पुजा सोनवणे , रेखा जैस्वाल , गिता कापुरे ,सुप्रिया चव्हाण ,राधा इंगळे , मन्सूर पटेल ,चंद्रकांत हिवराळे ,महेश माळवतकर ,गोकुळ मलके ,पंकज बोराडे , धनंजय पालोदकर , महेश राऊत,मयुर वंजारी ,आदी नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.