हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 13 रुग्ण; 186 रुग्णांवर उपचार,एक मृत्यू

हिंगोली,दि.25: जिल्ह्यात आज 13 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार वसमत परिसर 02 व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसरातील 8 व्यक्ती आणि कळमनुरी परिसर 3 असे एकूण 11 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज 32 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका 58 वर्षीय पुरुष यांचा कोव्हिड-19 मुळे आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 14 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 4 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 18 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 362 रुग्ण झाले असून, त्यापैकी 01 हजार 159 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 186 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 17 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *