उमरगा:शेंडगे हॉस्पिटलमधील सीटीस्कॅन मशिन विनापरवाना

डॉक्टर आर डी शेंडगे यांच्याविरूध्द अजून कारवाई झाली नाही

उमरगा,२५जुलै / नारायण गोस्वामी

गेल्या एक वर्षपासून  येथील आर डी शेंडगे हॉस्पिटल – रिसर्च सेंटरच्या  डॉक्टर आर डी शेंडगे यांच्याविरूध्द, विविध शासकीय योजनामध्ये गैरव्यवहार केल्याच्या  विविध तक्रारी च्या अनुषंगाने, चौकशी व कार्यवाही सुरू असताना , नवीनच प्रकार उघडकीस आला असून ,ह्या हॉस्पिटल मधील सीटीस्कॅन मशिन हे तब्बल चार वर्ष विनापरवना सुरू असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे .यात अतिशय गंभीर बाब म्हणजे हे मशीन विना पिसीपिएनडीटी ( गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तपासणी) कायद्यानुसार विनापरवाना कार्यरत होते. 
डॉक्टर आर डी शेंडगे यांनी अनेक योजनाच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी तत्कालीन वेळी अनेक रुग्णानी व नातेवाईकांनी ,संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात केल्या होत्या . मात्र विविध राजकीय नेत्यांच्या ,पुढाऱ्याच्या व अधिकारीवर्गाचा वरदहस्त असल्याने  त्यावर अजून कारवाई झाली नाही . मात्र विविध स्तरावर कारवाई करिता अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. 
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या एप्रिल महिन्यातील पत्रानुसार ,उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथील कार्यक्षेत्रातील ,नोंदणीकृत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची पीसीपीएएनडीटी ( गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तपासणी) कायद्यानुसार नोंदणीकृत तपासणी करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते . जे की बंधनकारक आहे . त्यानुसार येथील वैद्यकीय अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी आर डी शेंडगे रिसर्च हॉस्पिटल सेंटरची तपासणी केली असता ,हे मशीन विना पिसीपिएनडीटी ( गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तपासणी) कायद्यानुसार विनापरवाना चार वर्षे  कार्यरत होते. सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार सदर हॉस्पिटल ने  पिसीपिएनडीटी अंतर्गत परवाना प्रमानपत्रा करीता २०१७ मध्ये जिल्हाशल्यचिकित्सक ,जिल्हारुग्णालय उस्मानाबाद यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता .  मात्र परवाना मिळाला नाही .जो प्रलंबित होता . तरीही हे सीटीस्कॅन मशिन चार वर्षे बिनदिक्कत,विनापरवाना सुरू होते . इतका गंभीर प्रकार घडत असताना,आरोग्ययंत्रणा गप्प का होती?त्यांचावर कुणाचा दबाव होता का ?आहे का ? दोन महिन्यापूर्वी हि बाब तपासणीत उघड झाली ,अन्यथा सदर केंद्र हे अजून किती वर्षे विनापरवाना चालू राहिले असते . ह्या ठिकाणी गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व तपासण्या झाल्या का ?झाल्यास त्याचे रेकॉर्ड असेल का ? बेटी बचाव,बेटी पढाव असताना ,इतका गंभीर प्रकार कुणाच्या ” आशीर्वादाने आतापर्यंत सुरू होता याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे असून एखादा वरिष्ठ प्रामाणिक आधिकारीच हे गौडबंगाल बाहेर आणू शकेल .