श्रीक्षेत्र सराला बेट येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट : पंचकुंडीय यज्ञकुंड कार्यक्रमात उपस्थिती

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-परमपूज्य योगीराज गंगागिरी महाराज सरला बेट यांच्या 120 व्या पुण्यतिथी निमित्ताने मंदिराचा जीर्णोद्धार व देव-देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (ता.17)  “पंचकुंडीय यज्ञकुंड” कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. 

सदर ठिकाण हे पवित्र तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणाहून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात.हिंदू धर्मामध्ये वैदिक शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व असून स्तपन पूजा बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत  कराड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, भाजपा तालुका अध्यक्ष  कल्याण दांगोडे,  मोहन आप्पा आहेर ,अनिल पाटिल वाणी,  सचिन  राऊत यासह पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्यासंख्येने उपस्थित होते.