केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत उद्या वैजापूर येथे विविध कार्यक्रम

वैजापूर,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे शनिवारी (ता.17) वैजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत.

कराड हे सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र सराला बेट येथे भेट देतील त्यानंतर वैजापूर भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहेत. यावेळी 

इतर पक्षातील काही कार्यकर्ते व  पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षात प्रवेश सोहळा व नागरिकांची भेटी समस्या जाणून घेणार आहेत. दुपारी पक्ष कार्यकर्ते नाना गुंजाळ यांच्या हॉटेल नाना ढाबा भेट देतील व त्यानंतर तालुक्यातील पानगव्हाण ग्रामपंचायतच्या विविध विकास कामाचे उदघाटन करतील. कार्यक्रम आटोपल्यावर ते वेरूळकडे रवाना होतील.  तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी केले आहे.