सटाणा सोसायटीच्या चेअरमनपदी आशाबाई बोरणारे तर व्हाईस चेअरमनपदी गौराबाई राजपूत

वैजापूर,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक शुक्रवारी (ता.16) पार पडली. चेअरमनपदी आशाबाई गंगाधर बोरणारे यांची तर व्हाईस चेअरमन पदी गौराबाई भगवान राजपूत यांची निवड आली. 

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह सोसायटीच्या सर्व सदस्यांचा आमदार रमेश बोरणारे यांनी सत्कार केला. आमदार बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या सत्कार प्रसंगी ज्योती दिनेश बोरनारे, कैलास त्रिभुवन, नारायण कोठवडे, प्रेमसिंग ताजी, वामन बोरनारे, वाल्मीक बोरनारे, श्याम बोरनारे, रमेश राजपूत या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रमेश बोरणारे , दिनेश बोरणारे, विठ्ठल बोरणारे, शरद बोरनारे, विनोद बोरणारे, अशोक मालकर, कैलास बोरणारे, भगवान राजपूत, संदीप मालकर , राजेंद्र मालकर, गणेश ताजी, संजय जाधव, अनिल बोरणारे, प्रवीण बोरणारे, कैलास बोरणारे, अमोल बोलणारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.