मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) आयोगाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

नवी दिल्ली ,२४ ऑगस्ट :मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) आयोगाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुनील अरोरा, निवडणुक आयुक्त श्री अशोक लवासा, निवडणूक आयुक्त आणि परिसीमन आयोगाचे सदस्य श्री सुशील चंद्रा यावेळी उपस्थित होते. यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधांसह कॉन्फरन्स हॉलसह अन्य आवश्यक जागा उपलब्ध आहेत.

परिसीमन आयोगाने यापूर्वीच मार्च २०२० पासून काम करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत चार औपचारिक बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित सदस्यांना संबंधित प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेशांसाठी यापूर्वीच नामनिर्देशित करण्यात आले आहे. आयोगाने या राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासकीय जिल्हा ठरवण्याची तारीख १५ जून २०२० ठेवली आहे. माहिती गोळा करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. हे नवीन कार्यालय सुरू झाल्यामुळे अशी अपेक्षा आहे की, परिसीमनाची प्रक्रिया वेगवान होण्यासाठी सहयोगी सदस्यांसह औपचारिक चर्चा लवकरच सुरू होतील.

निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी, एनबीसीसी आणि आयटीडीसीचे अधिकारी देखील या समारंभास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *