त्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसऱ्याच दिवशी चूक मान्य- देवेंद्र फडणवीस

मुंबई :-शिंदे गटाने १३ जून रोजी राज्यातल्या प्रमुख वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरुन चांगलाच गदारोळ माजला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी माझ्याशी संवात साधून आमच्याचं काही लोकांनी चूक केल्याचं सांगितलं, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर भाजप आणि सेना यांच्यात दरी पडेल अशी चर्चा रंगली होती. या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकाला आहे.
१३ जून रोजी देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे अशा आशयाची जाहीरात छापून आली आणि राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आलं. या एका जाहिरातीनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं. यामुळे सेना-भाजप यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं असं बोललं जावू लागले. या जाहिरातीनंतर तर विरोधकांनी तर हे सरकार पडेल अशी भविष्यवाणीचं करुन टाकली. आता या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नसून दुसऱ्याचं दिवशी एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संवाद साधला असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात. ते चुकीचं काम करतात. एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मदभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल ते कधीच शक्य होऊ शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस मी राजशिष्टाचार मोडत नसून मुख्यमंत्री यांना मान सन्मान देतो, तसंच ते देखील मला मी उपमुख्यमंत्री आहे याची कधीच जाणीव होऊ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्हा दोघांना आमच्या मर्यादा माहिती आहे. त्यामुळे आज वर्ष होऊन देखील आम्ही एकत्र आहोत आणि पुढे जात आहोत. असं ते म्हणाले. आमच्यात मतभेद आहेत आणि हे सरकार पडेल असं अनेकांना वाटत पण असं होणार नाही. आम्ही ध्येय आणि विचाराने हे सरकार स्थापन केलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती नंतर शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारुन जाहिरात दिली नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

सुशांत प्रकरणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तपास सुरुच!

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं,  या प्रकरणाची जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून ते पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही, हे तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन  असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

जाणून घ्या सुशांत प्रकरणात संशय का वाढला?

यावर्षी जानेवारी महिन्यात सुशांत प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली होती. अभिनेत्याच्या शवविच्छेदनादरम्यान उपस्थित असलेले शवविच्छेदन कर्मचारी रूपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणला असता त्याच्या मानेवर आणि शरीराच्या काही भागावर जखमांच्या खुणा होत्या. रूपकुमार यांना याबाबत वरिष्ठांशी बोलायचे होते, मात्र त्यांनी याबाबत नंतर बोलू, असे सांगितले.

तसेच, शवविच्छेदन कर्मचार्‍यांनी सांगितले की  सुशांतच्या मृत्यूच्या वेळी कूपर रुग्णालयात पाच मृतदेह होते. यातील एक मृतदेह व्हीआयपीचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहायचे हे डॉक्टरांचे काम आहे, पण सुशांतचे फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की त्याची हत्या झाली आहे.