प्लास्मा दान करा या संदेशासाहित टपाल विभागातर्फे विशेष शिक्का प्रकाशित

गोवा, 24 ऑगस्ट 2020

गोवा टपाल विभागाने  24 ऑगस्ट  2020  रोजी “कोविड 19 चे उच्चाटन करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांनी प्लास्मा दान करा ” या घोषवाक्यासह विशेष शिक्का प्रकाशित केला. गोवा विभागाचे  पोस्टमास्टर जनरल, डॉ. एन. विनोदकुमार यांनी,टपाल भवन,  पणजी येथे आयोजित एका विशेष समारंभात शिक्का प्रसिद्ध केला. गोवा विभागातील टपाल कार्यालयांचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जी. जाखरे यांनी प्रास्ताविकात कॉन्व्हेलेसेंट प्लाझ्माचे महत्त्व आणि नुकत्याच बरे झालेल्या रूग्णांकडून स्वेच्छेने दान करण्याची गरज अधोरेखित केली. डॉ. एन. विनोदकुमार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि प्लास्मा दानासंदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमजुती पसरत आहेत आणि म्हणूनच प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या खूपच कमी आहे.

या विशेष संदेशामुळे कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्माच्या महत्त्वविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि  प्लास्मा दान  करण्यासाठी सक्रियपणे इतरांना माहिती देण्यासाठी प्रोत्साहित होतील.अशी आशा  त्यांनी व्यक्त केली. डॉ. एम.आर.रमेश कुमार, अध्यक्ष, गोवा फिलेटेलिक अँड न्युमिझमॅटिक सोसायटी [जीपीएनएस] यांनी  विशेष संदेशाबद्दल टपाल विभागाचे अभिनंदन केले आणि कोविड -19 ला आळा घालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी टपाल विभागाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *