औरंगाबाद शहरात ओमायक्रोनचे दोन रुग्ण सापडले

औरंगाबाद,२५ डिसेंबर /प्रतिनिधी:-

औरंगाबाद महानगरालिका हद्दीतील दोन पुरुष ओमायक्रोन पॉसिटियु सापडून आल्याची माहिती महानगरपालिेकेचे आरोग्य वैद्दकिय अधिकारी डॉक्टर पारस मांडलेचा यांनी दिली.

एनआरआय कुटुंबाचे एक 50वर्षीय पुरुष लंडन वरून भारतात १४ डिसेंबर रोजी आले. त्यांची मुलगी मुंबई येथे ओमायकरोन बाधित आढळून आली आणि मुंबई येथे लीलावती रुग्णालयात त्याला भरती केले. वडील व कुटुंबातील दुसरे सदस्य औरंगाबादला आले व सिल्वर इन हॉटेल येथे त्यांना अलगिकृत करण्यात आले होते. त्यांची परत RTPCR केले. वडीलचा RTPCR अहवाल पॉसीटियु आल्यामुळे sample genome sequencing साठी पाठवला. आज दिनांक २५ डिसेंबरला वडीलाचा ओमायकरोन चाचणी अहवाल पॉसीटियु आला. ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची तबीयत बरी आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचे RTPCR चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या सर्व सदस्यांना घरीच अल्गिकृत करण्यात आले आहे.
तसेच एका ३३ वर्षीय पुरुष दुबईहून १७ डिसेंबरला दिल्लीला परत आले.त्यांना थंडी व खोकलाचा त्रास होता. १८ डिसेंबर रोजी त्यांचा RTPCR टेस्ट केला असून तो पॉसीटियु आला. त्यांचा नमुना sample genome sequencing साठी पाठविण्यात आला.१९ डिसेंबर रोजी पासून त्यांनी खाजगी रुग्णालयात पांच दिवस उपचार घेतला. आज दिनांक २५ डिसेंबर ला त्यांचा ओमायक्रोन अहवाल पॉसीटियु आला. त्यांच्या कुटुंबातील एकूण तीन व्यक्त्यांचे RTPCR सेंपल घेतले व त्यांना मेलट्रोन कविड हॉस्पिटल येथे वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य वैदकिय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली.