भारतात 3.6 कोटी चाचण्या,23 लाखांपेक्षा जास्त कोरोनारूग्ण झाले बरे
सक्रीय रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट
सक्रीय रूग्णांपेक्षा 16 लाख जास्त रूग्ण झाले बरे
बाधित रुग्णांची वेळेवर आणि आक्रमक चाचण्यांच्या माध्यमातून ओळख पटवणे हा कोविड 19 महामारीला भारताने दिलेल्या प्रतिसादाचा मुख्य घटक राहिला आहे. त्वरित निदान आणि प्रभावी उपचारांसह अलगीकरण यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोविड 19 मुळे मृत्युदर घटत आहे.
भारताने आतापर्यन्त 3,59,02,137 चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासांत 6,09,917 चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दिशेने भारताची आगेकूच सुरु आहे.
देशभरातील निदान प्रयोगशाळा नेटवर्कच्या विस्तारामुळे चाचण्या करणे सुलभ झाले असून जास्तीत जास्त चाचण्या करणे शक्य झाले आहे. यामुळे प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या (टीपीएम) 26,016.वर पोहचली आहे. प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या (टीपीएम) सातत्याने वाढत आहे.
“कोविड -19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना समायोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष” या मार्गदर्शक निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्यानुसार दररोज प्रति दशलक्ष चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे.

देशात नैदानिक प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय नेटवर्कमधील वाढ हे चाचणी रणनीतीचे द्योतक आहे. आज देशात 1520 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात 984 प्रयोगशाळा आणि 536 खासगी प्रयोगशाळा आहेत. . यामध्ये
• रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 785 (सरकारी : 459 + खाजगी: 326 )
• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 617 (शासकीय: 491 + खाजगी: 126)
• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 118 ((सरकारी: 34 + खासगी: 84
23 लाखांपेक्षा जास्त कोरोनारूग्ण झाले बरे
भारतामध्ये बरे झालेल्या कोविड रूग्णांची संख्या आज 23 लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक रूग्ण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे होत आहेत. त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे. (तसेच अगदी किरकोळ, सौम्य आणि मध्यम प्रकारची लागण झालेल्या रुग्णांना घरामध्येच विलग ठेवण्यात आले आहे. तेही बरे झाले आहेत.)
देशभरामध्ये कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर सरकारने चाचण्या करण्याचे प्रमाण अतिशय आक्रमकपणे वाढविले, त्याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. चाचणी, पाठपुरावा आणि उपचार या तीन गोष्टींची सर्वंकष दक्षता घेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे देशातला कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचा आकडा 23,38,035 पर्यंत पोहोचला आहे. वैद्यकीय उपचार सेवेचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत आहे काय , हे कसोशीने पाहणे, अतिदक्षता विभाग आणि रूग्णालयांमधले कुशल वैद्यकीय पथक करीत असलेले कार्य, यामुळे कोरोनाग्रस्त लवकर बरे होत आहेत. तसेच रूग्णवाहिका सेवा सुधारण्यात आली आहे. डॉक्टरांकडून आरोग्य सेवा ‘प्रोटोकॉल’चे पालन केले जात आहे. त्यामुळे गंभीर कोविड रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. घरामध्येच विलगीकरणामध्ये असलेले रूग्ण लवकर बरे होत आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 57,469 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. भारतामध्ये कोविड-19 रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (75.27 टक्के) गेल्या काही महिन्यांपासून बरे होत असलेल्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
भारतामध्ये 16 लाखांपेक्षा जास्त (16,27,264) रूग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 7,10,771 आहे. (या रूग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत). कोरोनाबाधित होण्याच्या प्रमाणातही घट होत असल्यामुळे सक्रिय प्रकरणे कमी झाली. सध्या कोरोना सकारात्मक प्रकरणांचे प्रमाण 22.88 टक्के आहे. त्याचबरोबर कोरोना मृत्यूदरामध्येही घट झाली आहे. वैद्यकीय सुविधांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आणि अतिदक्षता विभागांमुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यूदरामध्ये घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने नवी दिल्लीच्या एम्सच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19’ या व्यवस्थापकीय योजनेमुळे भारतामधल्या कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात घट आली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील ई-व्यवस्थापनाचे आयोजन आठवड्यातून दोनवेळा- म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राज्यांतल्या कोविड रूग्णालयांमधल्या अतिदक्षता विभागातल्या वैद्यकीय पथकाला समाविष्ट करून घेण्यात येते. तसेच कोविड उपचाराविषयी सर्वांना पडत असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आरोग्य मंत्रालयामार्फत आत्तापर्यंत अशा प्रकारे 14 राष्ट्रीय ई-आयसीयू व्यवस्थापन केले आहे. त्यामध्ये देशभरातल्या 22 राज्यांतल्या 117 रूग्णालयांमधल्या वैद्यकीय पथकांना समावून घेण्यात आले आहे.