वीजचोरीविरोधी मोहीम:शिवाजीनगरमध्ये १६ वीजचोरांवर कारवाई

औरंगाबाद,२३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-महावितरण कंपनीच्या शहर विभाग क्र. २ मधील गारखेडा उपविभागाअंतर्गत शिवाजीनगर शाखेच्या वतीने मंगळवारी (२३ ऑगस्ट) वीजचोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली.  

   सिडको ई-सेक्टर शिवाजीनगर या भागामध्ये १६ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यात अंदाजे एक लाख रुपयापर्यंत वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे. या मोहिमेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशुतोष शिरोळे, सहायक अभियंता योगेश सोनवणे, अश्विनी अत्राम, मेघा चव्हाण, सोनाली तांदुळजे, सुनील राठोड, विक्रांत वैष्णव, जे.एम. पवार, विशाल घायाळ, रामा राठोड, आढावे, सपकाळ, बनकर, दंडे, राजू यांनी सहभाग घेतला. 

शहरातील 398 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडितमहावितरणची मोहीम सुरूच

औरंगाबाद : शहरातील वीजबिल थकबाकीदारांवरील मोहीम महावितरणने सोमवारीही राबविली. त्यात 398 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.     शहरातील अनेक घरगुती ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणने  सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार शनिवारपासून धडक अभियान करण्यात आले आहे. शनिवारी 109 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सोमवारी शहरातील 398 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. छावणी उपविभागात छावणी, पॉवर हाऊस, वाळूज उपविभागातील कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या मोहिमेत 135 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. तर याआधी तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या 73 ग्राहकांचे मीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर 172 ग्राहकांकडून वीजबिल भरून घेण्यात आले.    याशिवाय शहागंज उपविभागात 128, पॉवर हाऊस उपविभागात 20, गारखेडा, सिडको, चिकलठाणा, क्रांती चौक उपविभागात 115 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे.