“अरे कसले हिंदू , याला नामर्द म्हणतात”, उद्धव ठाकरे यांचा हिंगोली येथून घणाघात

सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, योजना सगळ्या कागदावरी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हिंगोली,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोली येथे घेतलेल्या निर्धार सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला. ‘शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी’ अशा खोचकशब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच सत्ताधाऱ्यांवर टीका करुन केली. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदारवरी, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसेही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम करं असं साकडं शंभू महादेवाला घातलं. माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाही, अशा शब्दात ठाकरेंनी साथ सोडलेल्या हिंगोलातील नेत्यांवर केली. गद्दारांवर बोलून वेळ घालवणार नाही, गद्दारांसाठी तुम्ही पुरेसे आहात, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी म्हटलं. गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांसाठी काम केलं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर, तेलंगाणाचे मुख्यमंत्री बीआरएसचे नेते केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला.

काही जणांना मी गद्दारांवर बोलेल अशी अपेक्षा असेल, पण मी गद्दारांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून त्यावरच बोलणार असल्याचं ते म्हणाले. मागे नागपंचमी गेली. आपण या गद्दाराला दुध पाजलं पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायाखाली ठेचलं पाहिजे, म्हणत त्यांनी संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला.

हे तर नामर्द

राज्य सरकार आणि भाजप सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे डबल इंजिन सरकार आणि आता अजित दादांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? तुम्हाला माझे नेते, वडील लागतात. पक्ष फोडला, पक्ष सोडा वडिल माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागयची हिंमत राहिली नाही? माझे वडील चोरणार, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणतात आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी केली.

फडणवीसांवर साधला निशाणा

हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, फडणवीस यांना मी बोलण सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो. पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच “राज्यात दुष्काळ आहे आणि फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागलं” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांचा टरबूज असा उल्लेख केला.

 ठाकरे यांनी परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमावरुन टीका केली. सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लई भारी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. अतिवृष्टीची मदत अजून सरकारला मिळालेली नाही. कांद्याचे देखील प्रश्न आहेत, सरकारनं केंद्रासोबत बोलणी करुन मध्यस्थी करायला पाहिजे होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिलं झालाय दुसरीकडे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार तोंडाच्या वाफा सोडतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सरकार आपल्या दारी कार्यक्रम आहे पण योजना सगळ्या कागदावरी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भाजपमध्ये सगळ्या पक्षातून आयाराम दाखल होत आहेत. सध्या भाजपच्या निष्ठावतांची दया येते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपमध्ये निष्ठावंत सतरंज्यावर पडलेले आहेत. राज्यात डबल इंजिन सरकार होतं, आता अजित पवारांचा डबा लागला आहे. तुमची मालगाडी होईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पक्ष फोडला आणि इतर पक्षातून नेते फोडतात, माझ्या वडिलांचा फोटो वापरणार आणि ताकद म्हणणार असं कसं चालेल, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

नरेंद्र मोदींनी गुजरातमधील बिल्कीस बानो यांच्याकडून राखी बांधून घ्यावी, असं आव्हान उद्धव ठाकरे दिलं. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी असलं हिंदुत्त्व स्वीकारलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही देशाच्या जो मुळावर आलाय त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व वेगळं आहे, असं ठाकरे म्हणाले. प्रदीप करुलकर सापडला तो कुणाच्या संघटनेशी संबंधित आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.