वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांचा माजी आमदार चिकटगावकर यांच्यातर्फे सत्कार

वैजापूर, ६ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या (VDA) नवीन कार्यकारीणीची निवड झाल्याबद्दल असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या वतीने मंगळवारी (ता.05) सत्कार  व स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. 

शहरातील वैष्णवी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर्स असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष- डॉ. सुभाष भोपळे, उपाध्यक्ष- डॉ. गणेश अग्रवाल, डॉ. धनंजय महाडीक, डॉ. दिनेश राजपूत, सचिव- डॉ. योगेश राजपूत, सहसचिव- डॉ. संदीप म्हस्के, कोषाअध्यक्ष- डॉ. पंकज संचेती, सहकोषाध्यक्ष डॉ. धरमचंद जैन, कार्यकारीणी सदस्य व सर्व डॉक्टर्स या सर्वांचा सत्कार करून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावक यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी एचडीएफसी बँक मॅनेजर गणेश पवार,  जिल्हा परिषदचे माजी  उपाध्यक्ष दिनकरराव पवार, खरेदी विक्री संघाचे उपसभापती मंजाहरी पाटील गाढे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, डॉ. राजीव डोंगरे, डॉ.एस.एम.जोशी, डॉ अमोल अन्नदाते, डॉ. अभिजीत अन्नदाते, डॉ. सुहास रहाणे, डॉ. नीलेश कदम, डॉ. बी. बी. शिंदे ,डॉ. अजीम पठाण, डॉ. संतोष गंगवाल, डॉ. ईश्वर अग्रवाल, डॉ. अर्जुन साळुंके, डॉ. सुधाकर मापारी, डॉ. बबन मोहन, डॉ. दत्ता साळुंके, डॉ. रवींद्र पाटील , डॉ. अमोल इंगळे, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. अरुण शिंदे, डॉ. ऋषिकेश सोनवणे, डॉ. परेश भोपळे, डॉ. प्रीती भोपळे, डॉ. रामेश्वर रोठे, डॉ. नितीन अग्रवाल, डॉ. दीपक राजगुरू, डॉ. नयन मोरे, डॉ. शरद साळुंके, डॉ. जगधने, डॉ. किशोर पवार, डॉ बाबासाहेब इंगळे, डॉ. महेश साठे, डॉ. कोठारी यांच्यासह सर्व डॉक्टर वर्ग उपस्थित होते.