वैजापूर गॅस एजन्सी औरंगाबाद विभागात उत्कृष्ट ; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पारितोषिक प्रदान

वैजापूर, ३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा वर्ष 2021-22 चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच औरंगाबाद येथे झाला. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी “वैजापूर गॅस एजन्सी” ला औरंगाबाद विभागीय क्षेत्रात प्रथम पुरस्कार देण्यात आला तसेच इतर दोन पुरस्कार सुद्धा देण्यात आले. 

वैजापूर गॅस एजन्सी वैजापूरचे संचालक यश खांबेकर आणि मनोज सोनवणे यांनी पारितोषिक स्विकारले.  हिन्दुस्तान पेट्रोलियमचे वी. एस. चक्रवर्ती (मुख्य महाप्रबंधक-एलपीजी पश्चिम क्षेत्र) कृष्ण कुमार हांडा (महाव्यवस्थापक एलपीजी विक्री,मुंबई) पी.श्रीनिवास (मुख्य क्षेत्रीय प्रबंधक, क्षेत्रीय कार्यालय,औरंगाबाद)  संजय कर्वे, देबारुन कुंडु, अजयपाल चौहान, गणेश कारवार, गोविंद पटेल व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.