श्रीक्षेत्र सराला बेट येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांची 120 व्या पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धार सोहळानिमित्त 16 ते 23 डिसेंबर दरम्यान ‘श्री हरिहर महायज्ञ’

पूर्वनियोजनासाठी आ.बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक

वैजापूर, ३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-क्षेत्र सराला बेट येथे योगिराज सदगुरू श्री गंगागिरी महाराज यांची 120 वी पुण्यतिथी व मंदीर जिर्णोध्दारपुर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्ताने “श्री हरिहर महायज्ञ” 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनासाठी बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज व आ.रमेश बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. 

बेटावर झालेल्या या बैठकीस माजी नगराध्यक्ष साबेर खान, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पंचायत समितीचे माजी सभापती बाबसाहेब पाटील जगताप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामहरी जाधव,बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आ. रमेश बोरणारे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या नियोजना बाबत सुचना दिल्या तसेच कार्यक्रमाच्या चालु असलेल्या पुर्वतयारी कामांची पाहणी केली.

यावेळी माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे, गटविकास अधिकारी हरकळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी. काकड, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता विरगावकर, कनिष्ठ अभियंता शेख व इतर अधिकारी उपस्थित होते.