“सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेले, आमदार गेले; आता तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लोकभावनांचा आदर राखा”

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची बोचरी टीका

मुंबई : “सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले…” असे म्हणत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले… लोकशाहीत बहुमत असावं लागतं जे आज नाही. आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा” असे केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“गेले एक आठवडा रोज संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही विधानभवनात सिद्ध करू. आता राज्यपालांनी सांगितलं सिद्ध करा तर बहुमत चाचणी नको म्हणून कोर्टात गेली ही मंडळी” असे देखील केशव उपाध्ये यांनी आणखी एक ट्विट केले आहे.