वैजापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी मोतीलाल संचेती यांचे निधन

वैजापूर,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा अरिहंत ज्वेलर्सचे मालक उमेश संचेती यांचे वडील मोतीलाल जुगराजचंद संचेती (68 वर्ष) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
मोतीलाल संचेती हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली हाती. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज सायंकाळी त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी  सकाळी दहा वाजता त्यांचा वैजापूर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.