शुध्द ह्दयातच सत्य ज्ञानाचा प्रसार होऊन  शांती आणि विज्ञानाची प्राप्ती :स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

दीन अधीन गरीब है,अहं वीपदा नाश । 

पटके मटुकी मान की,  ता घट गुरु कर वास ।।२१।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/२१

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

दीन-अधीन गरीब होऊन सद्गुरूंना शरण गेल्यास अहंकार आणि विपदांचा नाश होतो. अहंकारामुळेच सर्व संकटांनी ग्रासून जीवाचे अधःपतन होते. त्यामुळेच अहंकाराने निर्माण झालेले मानाचे मडके डोक्यावरून उतरवून खाली फेकून दिल्याने त्या ठिकाणी सद्गुरूंचा निवास होतो. अभिमानी मध्ये सद्गुरूंचे ज्ञान प्रगट होऊ शकत नाही. शुध्द ह्दयातच सत्य ज्ञानाचा प्रसार होऊन  शांती आणि विज्ञानाची प्राप्ती होते.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org