महापुरूषच पूर्ण पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला पूर्ण पणे  प्राप्त करतात:स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

ऐसा दृढ़ संकल्प हो, कोटि विघ्न यदि आय । 

तभी विकल्प न हो सके, पूरण पूरण पाय ।।४०।। 

(स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय) ०५/०४/४०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद  :

असा दृढ संकल्प असावा की, कोटी विघ्ने आली तरीही पुरुषार्थ सोडू नये , कितीही कष्ट पडले किंवा अडचणी आल्या तरीही  हाती घेतलेलं कार्य सोडून मागे हटू नये . पूर्ण पुरुषार्थी, महापुरूषच पूर्ण पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला पूर्ण पणे  प्राप्त करतात. ते कितीही कठीण प्रसंग आले तरीही आपल्या कार्यात विकल्प न करता म्हणजेच कार्य अर्धवट न सोडता कठीण पुरुषार्थाद्वारे आपला सत्यसंकल्प पूर्ण करतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org