राष्ट्रीय लोक अदालत :सामोपचाराने तीन हजार 345 प्रकरणांमध्ये तडजोड

औरंगाबाद,१२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाने जिल्हा विधि सेवा प्राधिकरण औरंगाबाद व जिल्हा व सत्र न्यायालयाने लोक अदालतीचे आयोजन आज केले  होते.  प्रलंबित आणि वादपुर्व प्रकरणांचे  1हजार 605 प्रलंबित व 1 हजार 740 दाखलपुर्व असे एकुण 3345 प्रकरणांमध्ये  लोक अदालत  मध्ये तडजोड झाली.   व्ही.पी.इंगळे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद तसेच श्रीमती वैशाली फडणीस, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  व सर्व न्यायिक अधिकारी  कर्मचारी यांनी यात  सहभाग नोंदवला.

    प्रलंबित प्रकरणांमध्ये एकुण रक्कम रू. 326870442/- व वादपुर्व प्रकरणांमध्ये एकुण रक्कम रूपये रू. 44224187/- इतकी वसुली झाली अशी एकुण रक्कम रूपये 371094629/- एवढया रकमेचा समावेश असलेली प्रकरणे लोक अदालतमध्ये तडजोडीने सोडवण्यात आली.

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, विद्युत चोरी, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. वादपुर्व प्रकरणामध्ये युनियन बॅंक आॅफ इंडिया,स्टेट बॅंक आॅफ इंडिया,सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया,पंजाब नॅशनल बॅंक, महाराष्ट्र बॅंक,महाराषट्र ग्रामिण बॅंक,बॅंक आॅफ इंडिया,इंडियन बॅंक,इंडियन ओव्हरसीज बॅंक,बॅंक आॅफ बडोदा,कॅनरा बॅंक,युको बॅंक,एस.बी.आय.क्रेडीट,आय.सी.आय.सी.आय.बॅंक,यवतमाळ अर्बन,टी.व्ही.एस.क्रेडीट,टाटा मोटार्स,आर्यानंदी नंदीनी फायनान्स,जाॅन डिअर फायनान्स,हिंदुजा फायनान्स,उज्जीवन स्माॅल फायनान्स,बी.एस.एन.एल,व्होडाफोन,बजाज फायनान्स,एल अॅण्ड टी फायनान्स,महापारेषण,एच.डी.एफ.सी.बॅंक,बजाज अॅटो फायनान्स,धनी लोन्स फायनान्स,एच.डी.बी.फायनान्स,एडीलेव्हीस हाऊसिंग फायनान्स,श्रीराम सिटी फायनान्स युनियन,चोलामंडल फायनान्स,भारत संचार निगम, वोडाफोन, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, अॅक्सीस बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, टी.व्ही.एस.क्रेडीट सव्र्हिसेस लि., आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

 लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वेगवेगळे शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे अधिकारी, वित्तीय संस्था, वकील व बॅंकेचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. लोक अदालतीच्या तयारीसाठी श्री.डी.एच.केळुसकर, जिल्हा न्यायाधीश-1, श्री.एस.के.कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-3, श्री.एस.एस.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-4, श्री.एस.एम.कोचे, जिल्हा न्यायाधीश-6, श्रीमती यु.एल.जोशी, जिल्हा न्यायाधीश-7, श्रीमती एस.जे.रामगढीया, जिल्हा न्यायाधीश-8, श्री.एस.एस.माडुकर, जिल्हा न्यायाधीश-10, श्री.एस.एम.आगरकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1, श्री.व्ही.आर.जगदाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2, श्रीमती ए.डी.लोखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-3, श्री.व्ही.एम.सुंदाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-4, श्री.के.आर.चैधरी, अति.जिल्हा न्यायाधीश, श्रीमती एस.ए.मलिक, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्रीमती एम.एस.सहस्त्रबुध्दे, सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्रीमती ए.डी.बोस, 2रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.के.एस.जाधव, 3रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्रीमती एस.डी.पंजवानी, 4थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्रीमती व्ही.आर.हंगरगेकर, 5वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.वाय.के.पुजारी, 6वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.आर.एम.तुवर, 7वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.ए.एस.पंडागळे, 8वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्रीमती यु.टी.मुसळे, 9वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.एम.आर.देशपांडे, मुख्य न्यायदंडाधिकरी, श्रीमती ए.एस.वानखेडे, 2रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, श्री.एस.पी.बेदरकर, 3रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, श्री.आर.व्ही.सपाटे, 8वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर तसेच सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, पोलिस अधिकारी, भूसंपादन अधिकारी, भूसंपादन संस्थेचे अधिकारी, मोबाईल कंपनीचे अधिकारी इत्यादी सोबत बैठका घेतल्या. सदर बैठकांमध्ये सर्व प्रलंबित प्रकरणाचे संबंधीत घटकांना लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.

   लोकअदालतमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणात पक्षकार हे वृध्द असल्याने त्यांना न्यायालयात लोकअदालत पॅनल क्रमांक 24 मा.न्यायाधीश एस.एम.आगरकर यांच्या समोर समक्ष उपस्थित राहू शकत नसल्याने मा.एस.एम.आगरकर साहेब हे स्वतः न्यायालयाबाहेर वाहनतळ येथे येवून वृध्दाची स्वतः तपासणी केली व सदर प्रकरणात तडजोड घडवली.

श्री.एस.के.कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-2, औरंगाबाद, श्री.एस.एस.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-3, औरंगाबाद, श्री.एस.एम.कोचे, जिल्हा न्यायाधीश-5, औरंगाबाद, श्रीमती यु.एल.जोशी, जिल्हा न्यायाधीश-6,औरंगाबाद, श्री.एस.एस.मोदेकर, जिल्हा न्यायाधीश-9, औरंगाबाद, श्री.व्ही.आर.जगदाळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2, औरंगाबाद, श्रीमती ए.डी.बोस, 2 रेे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, औरंगाबाद, श्रीमती व्ही.आर.हंगरगेकर, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, श्री.वाय.पी.पुजारी, 6 वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, औरंगाबाद, श्री.आर.एम.तुवर, 7 वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, औरंगाबाद, श्री.एस.पी.बेदरकर, 03 रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्री.एस.बी.पाटील, 6 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्रीमती एस.व्ही.चरडे, 5 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्री.एस.एस.छल्लानी,9वे  सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, श्री.शाहीद साजिदउझ्झमा, 12 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्री.एस.एल.रामटेके, 13वे  सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्री.व्ही.एच.खेडकर, 14 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद, श्री.एस.जी.गुणारी, 17 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, श्रीमती एस.एस.घोडके, 20 वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, औरंगाबाद व पॅनल  विधीज्ञांनी लोकअदालत यशस्वीतेसाठी काम पाहिले. एकुण 3345 प्रकरणांमधील पक्षकारांना न्याय मिळाला. सदर लोकअदालतीमध्ये जिल्हा वकील संघाने उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.