वैजापुरात महाविकास आघाडीतर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध

वैजापूर, ८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा महाविकास आघाडी वैजापूरच्यावतीने मंगळवारी (ता.8) निषेध करण्यात आला. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीतर्फे यावेळी करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात झालेल्या या निषेध कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील,  माजी आमदार भाऊसाहे पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांची भाषणे झाली. सध्या देशात व राज्यात अराजकता निर्माण झाली असल्याचे सांगून राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध त्यांनी केला.  

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकरराव पवार,  दीपकसिंग राजपूत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र मगर, प्रभाकर बापू बारसे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रिखाबसेठ पाटणी, साईनाथ मतसागर, तालुका कार्याध्यक्ष उत्तम निकम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष प्रशांत शिंदे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे, ओबीसी सेल तालुकाअध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब साळुंके, भरत कदम,युवक विधानसभा अध्यक्ष अमोल बावचे, कार्याध्यक्ष सागर गायकवाड, तालुका उपाध्यक्ष प्रवीण साबळे, कैलास ठोंबरे ,शहर कार्याध्यक्ष लखन त्रिभुवन शहर विद्यार्थी अध्यक्ष अक्षय बुट्टे, तालुका कार्यध्यक्ष रामेश्वर गोरे तालुका उपाध्यक्ष आकाश फाळके आदीसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.