एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड ; वैजापुरात जल्लोष

वैजापूर ,३० जून  /प्रतिनिधी :-एकनाथ शिंदे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे वृत्त कळताच वैजापूर येथे त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज शहरातून मिरवणूक काढली. फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला.


एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे समजताच आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या समर्थकांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा होऊन जोरदार घोषणाबाजी करून फटाके फोडले व पेढे वाटून जल्लोष केला.  याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकाप्रमुख सलीम वैजापूरी, नगरसेवक डॉ.निलेश भाटिया, स्वप्नील जेजुरकर, इम्रान कुरेशी, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, महेश बुणगे, कल्याण पाटील जगताप, युवासेनेचे आमीर अली, श्रीराम गायकवाड, अमोल बोरणारे, सीताराम पाटील वैद्य, बंडू राजपूत, कमलेश आंबेकर, रामदास वाघ, गोरख आहेर, नानासाहेब थोरात, सुनील कारभार, दौलतराव गायकवाड, हरिभाऊ साळुंके, संदीप बोर्डे,संजय पवार आदीं उपस्थित होते.

महालगाव येथे भाजपचा जल्लोष

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील महालगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला.  याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब पाटील झिंजुर्डे. माजी जिल्हा परिषदे सदस्य शिवाजी पाटील काळे. प्रमोद कृषी उद्योगचे दत्ता पाटील नांगरे. मंगेश गायकवाड. छत्रपती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर पाटील पाटोळे. ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत नजन. गणेश आहेर. शिवाजीनाना गायके. कैलास बनकर. अशोक टेमकर. बाळू झिंजुर्डे.प्रसाद वनवे.आदी उपस्थित होते.