येत्या मंगळवारी 08 नोव्हेंबर 2022 रोजी (कार्तिक 17, शके 1944) खग्रास चंद्रग्रहण

नवी दिल्ली,​६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- येत्या मंगळवारी, 8 नोव्हेंबर 2022 (कार्तिक 17, शके 1944) रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणाहून दिसेल. मात्र, ग्रहणाच्या आंशिक आणि खग्रास टप्प्यांची सुरुवात भारतात कुठूनही दिसणार नाही,  कारण चंद्रोदयाच्या आधीच ग्रहणकाळ सुरू होणार आहे.

खग्रास आणि आंशिक अशा दोन्ही टप्प्यांवर अखेरीचा चंद्र  देशाच्या पूर्वेकडील भागांतून दिसू शकेल. देशाच्या उर्वरित भागातून केवळ आंशिक टप्प्याचा शेवट दिसणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार ग्रहण दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल.  खग्रास चंद्रग्रहण 3 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. खग्रास टप्पा सायंकाळी 5  वाजून 12 मिनिटांनी तर आंशिक टप्पा 6 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू सारख्या इतर शहरांचा विचार करता, चंद्रोदयाच्या वेळी, खग्रास समाप्तीनंतरचे आंशिक ग्रहण चालू असेल आणि वरील शहरांमध्‍ये , चंद्रोदयाच्या वेळेपासून अनुक्रमे 50 मिनिटे , 18 मिनिटे , 40 मिनिटे,  आणि 29 मिनिटे,  काळांसाठी आंशिक ग्रहण संपेपर्यंत ते दिसू शकेल.