आलियाने दिली गोड बातमी; कपूर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टने अखेर गोड बातमी देऊन टाकली आहे. तिने आज मुलीला जन्म दिला आहे, आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न झाले आहे. आलियाने सर एच एन रिलायन्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला. आलियाला आज सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आलियाने मुला जन्म देण्यानंतर अभिनेत्री चिमुकलीचं नाव काय ठेवेल याकडे लक्ष लागलं आहे. आलिया भट्टने जन्माआधीच बाळाच्या नावाबाबत संकेत दिले होते.  डिलीव्हरी आधीच आलियाने होणाऱ्या बाळाचं नाव ठरवलं होतं.

आलियाने स्वतःच्या आणि पती रणबीरच्या नावावरुन बाळाचं नाव ठरवलं होतं. आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं प्रमोशन करत होती. तेव्हा आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला. मुलाखती दरम्यान आलियाला विचारलं, ‘तिचं नाव आलिया ऐवजी दुसरं असतं, तिने कोणत्या नावाची निवड केली असती.’ तेव्हा आलियाने आवडत्या नावाबद्दल सांगितलं.

आलिया भट्टने तिचं आवडतं नाव आयरा सांगितलं. आयरा नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आलियाच्या नावाचं पहिलं अक्षर सुरुवातीला ‘आ’ असून   रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर शेवटी ‘र’ आहे. त्यामुळे आलिया आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवू शकते असा अंदाज बांधला जात आहे.