मनुष्यजन्मातच परमेश्वरप्राप्ती साठी प्रयत्न केला पाहिजे-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

तृण घर तृण शैय्या हवै, अग्नि लगै जर सोय ।

तामहॅं सोय सुख चाहहीं, त्यों जग की गति होय ।।१८८।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/१८८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

सुकलेल्या गवताची शय्या आणि त्याचीच चादर आहे. त्याला आग लागलेली आहे आणि ते हळूहळू जळत आहे. अशा शैय्येवर सुखनिद्रा घेणारा किती अज्ञानी आहे. तो त्या गवताबरोबर जळून भस्म होणार आहे. हीच गती संसारातील अज्ञानी जीवांची आहे, जे नश्वर संसारातील विविध भोगांचं सुख मिळवण्यात मग्न आहेत. सत्य आणि शाश्वत सुख परमेश्वरात आहे. म्हणून मनुष्यजन्मातच परमेश्वरप्राप्ती साठी प्रयत्न केला पाहिजे. संसाराची क्षणभंगूरता विसरता कामा नये.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org