मानवतेचा झरा: डॉ.भागवत कराड

May be an image of text that says "खासदार डॉ. भागवत कराड Y @ bhagwatkarad"

डॉ.भागवत किशनराव कराड,केंद्रीय वित्त राज्यमंत्री,भारत सरकार,165,नॉर्थ ब्लॉक ,नवी दिल्ली.110001.असा कार्यालयीन पत्ता असलेल्या डॉ.भागवत कराड यांचा जन्म मराठवाडा विभागातील जिल्हा लातूर आणि अहमदपूर तालुक्यातील चिखली या गावी दि.16 जुलै1956 ह्या वर्षी झाला.  आई गयाबाई व वडील किशनराव यांनी कष्टप्रद जीवन जगत.त्यांना एकूण दहा अपत्ये झाली पण काही मुले अल्पायुषी ठरली. त्यांची मुले डॉ.भागवत व दीपक,अंगद आणि दोन कन्या दीपाली व उज्जला यांना शालेय शिक्षण देत संगोपन केले.घरात वारकरी संप्रदायाचे महान राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या आध्यत्मिक सुधारणावादी विचारांचे वातावरण होते.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.भागवत कराड यांनी गरिबी,सर्वसामान्यांच्या वेदना व दुःख बालपणापासूनच अनुभवल्या व पाहिल्या आहेत.घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थिती मुळे माध्यमिक शाळे पर्यंत चे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले.पण लहान वयातच शिक्षण शिकून मोठे व्हायचे स्वप्न उराशी होते.म्हणूनच पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे एमबीबीएस ,एम.एस.(सामान्य शस्त्रक्रिया)पूर्ण केल्या नंतर डॉ.वाय.एस खेडकर यांनी डॉ भागवत कराड यांना एफ.सि.पी.एस.(बालरोग शस्त्रक्रिया),एम.सी एच.(बालरोग शस्त्रक्रिया) हे शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केले.आणि हाच डॉ.कराड यांच्या जीवनाला वळण देणारा निर्णय ठरला.एम एस.(सामान्य शस्त्रक्रिया) पूर्ण झाल्यावर मुंबई येथे एफ.सी.पी.एस.(बालरोग शस्त्रक्रिया)एम. सी.एच.(बालरोग शस्त्रक्रिया)हे अतिउच्च शिक्षण पूर्ण केले.

डॉ.भागवत कराड यांनी डॉ.वाय.एस.खेडकर यांचे कडून अनेक प्रेरणादायी वैचारिक बाबी व कार्यसिद्धांत आत्मसात केले.कारण डॉ.वाय. एस.खेडकर व डॉ.भागवत कराड हे दोघेही कठीण जीवनसंघर्षातून आले आहेत,विनम्रतेतून आदरणीय व मोहक व्यक्तित्वाचे निर्माण होते अशा विचाराचे संस्कार वाय.एस.खेडकर यांनी दिले.मराठवाड्यातील पाहिले ई.एन.टी.सर्जन असलेले,समाजातील उच्च विद्वान आणि नम्र,प्रतिष्ठित व्यक्ती असलेले वाय.एस. खेडकर यांना आपले जावई ही तेव्हढेच उच्च शिक्षित असावे अशी मनोमन इच्छा होती.वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबाद येथे वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली.वैद्यकीय शिक्षण एम.एस.(सामान्य शस्त्रक्रिया) केल्या नंतर एमसीएच(बालरोग शस्त्रक्रिया)करणारे डॉ.कराड हे  मराठवाड्यातील पहिले तज्ञ ठरले.त्या मुळे अनेक बालकांना दूरदेशी अथवा मुबई पुण्यात घेऊन जाण्या ऐवजी उपचारासाठी महाराष्ट्राच्या मध्यवर्ती औरंगाबाद येथे वैद्यकीय शल्यचिकित्सा उपलब्ध झाली. डॉक्टर भागवत कराड यांचा विवाह डॉ.वाय.एस.खेडकर(यादव सोनाजी खेडकर) यांच्या जेष्ठ कन्या डॉ.अंजली यांचे सोबत झाल्या नंतर खऱ्या अर्थाने डॉ.भागवत कराड यांच्या कार्यकर्तृत्वाला बहार आला.डॉ.अंजली डॉ.भागवत कराड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.डॉ.कराड यांनी स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले.स्वतः च्या दोन बहीनी व भावाला उच्चशिक्षण मिळावे म्हणून डॉ.भागवत कराड व डॉ.अंजली यांनी जबाबदारी घेतली व औरंगाबाद ला आणून त्यांना आधार देत त्यांच्या ही जीवनाला दिशा दिली.लातूरच्या माजी नगराध्यक्षा दीपालीताई गित्ते व प्रसिद्ध डॉ.उज्ज्वलाताई दहिफळे ह्या डॉक्टर कराड यांच्या भगिनी आहेत.         

डॉ.भागवत कराड वैद्यकीय व्यवसायात असतानाच यांनी बालवयापासून पाहिलेल्या असहाय्य, कष्टकरी,शेतकरी, कामगार,सामान्य माणसाच्या उपयोगी पडण्यासाठी काही वेगळे केले पाहिजे असे सतत विचार करीत, या साठी.डॉक्टरांचे संवेदनशील मन अस्वस्थ व्हायचे.ह्या जाणिवेतूनच डॉक्टरांनी अनेक ठिकाणी, तालुका ,गाव,खेड्यात आरोग्य शिबीरे घेतली.डॉ.अंजली ह्या देखील सोबत असायच्या,अनेक वेळा शिबिराच्या ठिकाणीच आहे त्या पारीस्थितीत थांबून मुक्काम करावा लागायचा.     

औरंगाबाद येथील  ‘समता नगर’ सारख्या भागात निवास व हॉस्पिटल असणाऱ्या डॉ.भागवत कराड यांच्या सेवाभाव व वैद्यकीय सेवेमुळे दिनदुबळ्या माणसां पासून ते समाजातील उच्चभ्रू माणसा पर्यंत ,जातपात, धर्म पंथाच्या पुढे जाऊन माणसे जोडली गेली.मानवतेचा झरा डॉक्टरांच्या स्वभावातच असल्याने त्यांचे सेवाकार्य अव्याहत चालूच होते.   डॉ.भागवत कराड यांचे वर गोपीनाथराव मुंडे यांच्या विचार व नेतृत्वा चा प्रभाव होताच. राजकारण हे ही समाज सेवेचे उत्तम माध्यम आहे व उच्च शिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असे डॉ.कराड यांना नेहमी वाटे,पण हे इतरांना सांगतांनाच स्वतः जबाबदारी ने राजकीय कार्यास सुरुवात केली.1995 च्या औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत डॉ.भागवत कराड अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले.         

May be an image of 9 people

लोकनेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी डॉ.भागवत कराड यांना आयएमए हॉल येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेशित केले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ‘उतणार नाही मातनार नाही,घेतला वसा टाकणार नाही!’, ‘राजकारण हे विकास व गोरगरिबांच्या कल्याणा साठी मी करतो!’असे म्हणत. ह्याच विचारांचा वारसा घेऊन राजकीय वाटचाल करायची हे डॉ.कराड यांनी ठरवले.

May be an image of 2 people

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना डॉ.कराड यांनी आपले नेता मानले व मुंडे यांच्या स्वर्गवासानंतर डॉ.भागवत कराड यांनी पंकजाताई मुंडे यांना आपले नेता मानले.पंकजाताईही आदराने डॉ.भागवत कराड यांना ‘काका’ म्हणून संबोधतात.भाजपा प्रवेशा नंतर गोपीनाथराव मुंडे यांचे  मराठवाड्या तील विश्वासू म्हणून डॉ.कराड ओळखले जाऊ लागले.मुंडे अनेक महत्वपूर्ण कार्य डॉ.कराड यांना सांगत,डॉ.कराड देखील मिशन म्हणून ते कार्य पूर्ण करत.डॉ.कराड गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाने मनपा मध्ये संख्याबळ कमी असूनही 1997- 1998 ह्या वर्षी औरंगाबाद शहराच्या उपमहापौर पदी तर 1999 – 2000 आणि 2006 -2007 ह्या वर्षी महापौर पदी विराजमान झाले.भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना पदे मिळवून दिली, पदाधिकारी, नगरसेवक केले, राजकीय कौशल्याने  पदे मिळवून दिली.जोडतोड चे राजकारण व कौशल्याने पक्षाची राजकीय ताकद वाढविली.म्हणूनच डॉ.कराड यांना राजकारणातील शल्यचिकित्सक असेही अनेक जण म्हणतात.   

May be an image of 1 person

   

डॉक्टर भागवत कराड त्यांच्या कडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकी व जिव्हाळ्याने बोलतात,म्हणणे ऐकून घेतात,प्रश्न समजून घेतात.त्यामुळे त्यांना प्रत्येक माणूस कायमचा जोडला जातो.भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक कार्य हिरीरीने ते करतात.भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष,प्रदेश चिटणीस,प्रदेश ओबीसी आघाडी अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष अशा जबाबदारी चे निर्वहन त्यांनी केले.औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याची संघटनात्मक व राजकिय शक्ती वाढविण्यासाठी त्यांचे वर पार्टीने विशेष जबाबदारी सोपवली,त्या जबाबदारी ला त्यांनी पूर्ण न्याय दिला.औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असणारी त्यामुळे भारतीय जनता पार्टी ठरली आहे.डॉक्टर कराड यांचे कार्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी पथदर्शी आहे.वेळ काळाची तमा न बाळगता पक्ष कार्यासाठी,समाज व कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारे नेतृत्व ही प्रतिमा त्यामुळेच सर्वत्र निर्माण झाली. ह्या सर्व कार्यात कुटुंबियांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही पण पत्नी डॉ.अंजली व तीन मुलांनी डॉक्टरांना त्यांच्या कार्यात नेहमीच साथ दिली आहे.     डॉ.भागवत कराड औरंगाबाद ग्रामीण चे जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडताना जिल्हाभर प्रवास व्हायचा जिल्हा कार्यालायमंत्री ह्या दायित्वाने मी त्यांच्या अनेक दौऱ्यावर सोबत असायचो,अनेक मोठे नेते पदाधिकारी यावेळी सोबत असायचे,या दौऱ्यात ते संघटनात्मक व राजकीय  व प्रशासन चालविण्याचे अनुभव  प्रवासा दरम्यान सांगायचे.त्यामुळे सहजगत्या सोबत चे कार्यकर्ते,नेते पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत,अनेक बाबी शिकायला भेटत.कार्यकर्त्यांना राजकीय कार्यात सक्रिय करण्यात डॉ.कराड यांचा हातखंडा आहे,आणि म्हणूनच डॉ.कराड हे कार्यकर्ते घडविण्याचे विद्यापीठ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.     

May be an image of 12 people

डॉ.भागवत कराड यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा दि.25 जून 2018 रोजी पदभार घेतल्यावर मराठवाड्याच्या विकासा साठी बैठकांचा धडाका लावला. वैधानिक विकास मंडळांची निर्मिती मुळात विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी झाली,परंतु डॉ. कराड यांनी पदभार घेण्यापूर्वी मंडळाचे कामकाज ठप्प झालेले होते,त्याला डॉ.भागवत कराड यांनी गती दिली.सिंचन,कृषी, मानव्य विकास, आरोग्य शिक्षण अशा अनेक बाबींचा आढावा घेऊन प्रस्ताव शासना कडे दिल्या जाऊ लागले.मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जाचे असल्याने विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन अनेक विकास कामे गतिमान करण्याचे कार्य तेव्हा डॉ.कराड यांनी केले. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातुन  लोक डॉ.कराड यांच्या कडे येत.त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी डॉ.कराड हे केंद्रबिंदू झाले.सामाजिक व विकास कामासाठी आयोजित बैठकीत डॉ.कराड अधिकारी व सामाजिक, राजकीय, पत्रकार व जाणकार मंडळींना सहभागी करून घेत.अशा अनेक बैठकांना मी सुद्धा उपस्थित असल्याने मी स्वतः ह्या कार्यपद्धती चा अनुभव घेतला आहे.तत्कालीन राज्याच्या अनेक मंत्र्यांनी देखील डॉ.कराड यांच्या विनंती वरून विकास कामासाठी वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात बैठका घेतल्या.दीड वर्षाच्या कार्यकाळात डॉक्टर कराड यांनी 100 पेक्षा जास्त बैठका घेऊन मंडळ गतिमान केले.तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील डॉ.भागवत कराड यांच्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळातील  कार्याचे कौतुक केले.   

May be an image of 2 people

   

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात सत्तांतर झाले,भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आली.तरीही डॉक्टर भागवत कराड कधीच थांबले नाहीत.त्यांच्या कार्यात गरीब,उपेक्षित,मागासवर्गीय,वंचित घटकाला त्याचा न्याय व हक्क मिळाला पाहिजे हे ध्येय आहे. ‘माणसाचा माणूस म्हणून सन्मान व्हावा!’ या साठी ही लढाई आहे,असे डॉ.भागवत कराड नेहमी म्हणतात.अनेक प्रवासात व बैठकीत सोबत असतांना त्यांचे एक वाक्य असायचे ‘समाजसेवा व गोरगरिबांच्या सेवा हाच खरा धर्म आहे.’ डॉक्टरांचा हा विचारच सर्वांना प्रेरणा देणारा आहे.प्रचंड प्रवास करणारे डॉक्टर श्रमाने,प्रवासाने थकलेले आम्ही कधी पाहिले नाहीत.     

May be an image of 22 people

कार्यतत्पर डॉक्टर भागवत कराड यांचे नाव राज्यसभा खासदार पदा साठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केले.3 एप्रिल 2020 रोजी डॉक्टर भागवत कराड संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे खासदार झाले.खासदार झाल्या नंतर डॉक्टर कराड यांनी औरंगाबाद व संबंध मराठवाड्याचा दौरा केला.     

कोरोना महामारीने उच्छाद मांडला असतांना जीवाची पर्वा न करता त्यांनी सेवा कार्यात स्वतःला झोकून दिले,सेवा कार्यासाठी सर्वांना प्रेरित केले,वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व दिग्गजांच्या भेटी व बैठका घेऊन यंत्रणा कामाला लावली.लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर लोकांना अन्नधान्याच्या पुरवठा,जेवण पुरवणे,बाहेर राज्यातील जनतेला त्यांच्या गावी जाण्या साठी व्यवस्था निर्माण करणे,गरजू रुग्णाला बेड मिळवून देण्या पासून ते कोविड रुग्णालयात योग्य उपचार व्हावेत म्हणून कार्यकर्ते व प्रशासनाला सोबत घेत प्रचंड मेहनत घेतली.     

दरम्यान च्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी कडून मंत्रिमंडळ फेरबदलचे संकेत मिळत असताना अचानक डॉ.कराड यांना पुनर्रचित मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या अनुषंगाने दिल्लीत येण्याचे आदेश पार्टी कडून देण्यात आले. कामाचा झपाटा,अभ्यासू वृत्ती,ओबीसी समाजाचे तरीही सर्वसमावेशक व्यक्तिमत्व, प्रशासन चालविण्याचा अनुभव,अति उच्च शिक्षित,मराठी,हिंदी,इंग्रजी वरील प्रभुत्व अशा बहुविध बाबींचा सार्थ विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.भागवत किशनराव कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला.   

Image

     

भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ.कराड यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची पद व  गोपनीयतेची शपथ दिली.डॉ.भागवत कराड यांच्या कडे वित्त राज्य मंत्रालयाचा कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवला आहे.  डॉ.भागवत कराड यांना वित्त मंत्रालयाचा कार्यभार आणि लोकसंवाद कायम ठेवत मार्गक्रमण करावयाचे आहे.संयमी व कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी डॉ.भागवत कराड हे कार्य  सहजगत्या करतील.कर्तबगार, अभ्यासू,आणि सक्षम नेतृत्व डॉ.भागवत कराड यांना माझ्या व तमाम जनतेच्या वतीने केंद्रीय वित्त राज्यमंत्री पदी झालेली निवडी बद्दल व  वाढदिवसाच्या उत्तमआरोग्य,दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.

व्यंकटेश कमळू

जिल्हा कार्यालयमंत्री,भारतीय जनता पार्टी,औरंगाबाद ग्रामीण जिल्हा.