पुरणगाव ग्रामपंचायत कार्यालय व आरओ फिल्टरचे जेष्टनेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पुरणगाव येथे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय (15 लक्ष रुपये) व RO फिल्टर (4 लक्ष रुपये) या विकास कामांचा लोकार्पण सोहळा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष  भाऊसाहेब पाटील ठोबंरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, पंचायत समिती सदस्य विनायक गाडे, दिगंबर तुरकणे, प्रकाश डोखे, युवक काँग्रेसचे सत्यजित सोमंवशी,  अमृत शिंदे (सरपंच भालगाव) विकास पाटील सोमंवशी (सरपंच लाडगाव) विद्या प्रविण कसबे (सरपंच पुरणगाव) ररमेश बबन लहिरे (उपसरपंच पुरणगाव), ग्रामपंचायत सदस्य संदीप गरूड, पुष्पा ठोबंरे, ज्योती ठोबंरे, रोहीणी लोखंडे, सिताबाई कसबे, रूख्मिणीबाई कौसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.