सामाजिक अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील 14 हजार 438 लाभार्थ्यांच्या खात्यात 5 कोटी 91 लाख 7 हजार जमा – तहसीलदार राहुल गायकवाड

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्र व राज्य सरकारचे सामाजिक अर्थ साहाय्य योजनेचे 14 हजार 438 लाभार्थ्यांचे बॅक खात्यात तहसील प्रशासनाने पाच कोटी 91 लाख सात हजारांची रक्कम जमा करण्याची कारवाई केल्याची माहिती तहसीलदार राहूल गायकवाड यांनी दिली.

शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रीय तसेच ग्रामीण बँकेकडे शाखानिहाय निराधार योजनेतील अंध, अपंग, विधवा लाभार्थ्यांना दिवाळीसाठी आर्थिक रक्कम उपलब्ध करुन देण्याचे नियोजन संजय गांधी निराधार विभागाचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, योगेश पुंडे ,जितेंद्र जाधव, माणिक जाधव, कोतवाल जलिंदर वाघ, अहमद पठाण यांनी केले.15 ऑक्टोबर रोजी साई लाॅन्स मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यात लाभार्थ्यांकडून त्यांचे आधार कार्ड , बॅक खात्याचा क्रंमाक महसूल मंडळातील गावानुसार संकलित केले होते.त्यांची अचूक  वर्गवारी करून लाभार्थ्यांचे खात्यावर मासिक रक्कम जमा करण्यात आली. दरम्यान बॅकाकडे पाठवलेल्या यादीत राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीने जानेवारीत मंजूर केलेले नवीन अडीच हजार लाभार्थ्यांना योजनेचा आर्थिक लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कारवाई केली असल्याचे या विभागाचे योगेश पुंडे यांनी कळवले.