वैजापूर शहरात खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक

वैजापूर,१७ एप्रिल  /प्रतिनिधी :- खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त शनिवारी शहरात विविध कार्यक्रमाचे आयौजन करण्यात आले होते. खंडोबा देवाच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली.

सायंकाळी बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमासोबत शोभेच्या दारूचीआतषबाजीही करण्यात आली. रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम ही झाला. दोन वर्षे करोनामुळे यात्रा महोत्सव झाला नव्हता. त्यामुळे खंडोबा भक्तांनी या वर्षी जल्लोषात हा उत्सव साजरा केला.

या उत्सवात तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान,ठाकूर  धोंडीरामसिंह राजपूत, व्यापारी संघाचे काशीनाथ गायकवाड, नगरसेवक दशरथ बनकर, प्रकाश बोथरा, शिवलिंग साखरे, चंद्रकांत निकम, बजरंग मगर आदी सहभागी झाले होते. अशोक जेजुरकर, राजू महाजन, प्रवीण वाणी, गणेश खंडागळे, अंकुश महाजन, अशोक जवादे यांनी सहकार्य केले.