वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी निदर्शने

वैजापूर ,२७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात सोमवारी (ता.27) वैजापूर येथे निदर्शने करण्यात आली.

शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही निदर्शने  करण्यात आली. या निदर्शने कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोबंरे, विनायक गाढे,  दत्तात्रय पाटील वाकलेकर,  सुरज पवार,  विनायक गाडे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब  भोसले, ज्ञानेश्वर घोडके.आर. व्ही. पाटील, 

प्रदीप चंदणे,  राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडीच्या सुनीता साखरे, ज्योती शिंदे (कापसे), राजू कराळे,  साईनाथ आहेर, सत्यजित सोमंवंशी, पुंडलीक गायकवाड, प्रकाश चंदने, अमृत शिंदे, गणेश पवार टेंभीकर, ऐराज शेख, चंद्रकांत साळुंखे, बंटी मगर,   संकेत चुडीवाल, ऋषीकेश अनर्थे, अर्जुन मोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.