औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात निष्ठा यात्रेला प्रारंभ

औरंगाबाद,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात दोन दिवसीय निष्ठा यात्रेला राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते मशालीचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला.यावेळी मशाल हाती घेऊन शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

रँलीने अनेकांचे लक्ष वेधले गेले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जिंदाबाद,हा आवाज कोणाचा शिवसेनेचा, या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.यावेळी संयोजक शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, प्रभाकर मते, उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, अनिल जयस्वाल, संजय हरणे, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, सचिन खैरे, असिफ शेख ,शेख रब्बानी, शिवाजी आपरे, विनायक देशमुख, राजू खरे, चंद्रकांत इंगळे, किशोर नागरे, हेमंत दीक्षित, रंनजीत दाभाडे, ज्ञानेश्वर शेळके, युवासेना जिल्हा युवाअधिकारी हनुमान शिंदे, सागर खरगे आदी शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.