लटके यांचा राजीनामा स्वीकारला नाहीच; उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार

मुंबई,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या नोकरीचा त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. याच कारणामुळे नोकरीचा राजीनामा न देता त्या निवडणूक लढवत असल्याचा आरोप होत आहे. सर्व कामे पूर्ण करूनही प्रशासन राजीनामा स्वीकारत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गट आणि ऋतुजा लटके करत आहेत. या विरोधात ऋतुजा लटके यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशासनाला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे.